| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नीट पेपरफुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे सोनम वांगचुक यांनी अखेर आपले 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई दिली जाईल आणि परीक्षा पद्धतीतील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत गांभीर्याने मांडला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. उपोषण सोडल्यानंतर मेदांता रुग्णालयातून प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात 59 वर्षीय सोनम वांगचुक यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.







