दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका जिंकली

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका ही 1-0 अशा फरकाने जिंकली. उभयसंघातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि मालिकाही खिशात घातली. त्यानंतर आता दोन्ही संघात टी-20 मालिका होणार आहे. ही मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी-20 मालिकेत रोव्हमन पॉवेल हा वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर रोस्टन चेस याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबादारी असणार आहे. या मालिकेला 23 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा 25 तर तिसरा आणि अंतिम सामना हा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे ब्रायन लारा क्रिकेट एकादमी येथे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली आहे. त्यानंतर आता पाहुण्या संघाचा टी सीरिज जिंकण्याचा मानस असणार आहे. तर विंडिज ही मालिका जिंकून हिशोब बरोबर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरतं? हे लवकरच ठरेल. दरम्यान आता दोन्ही संघांना पुढील 4 दिवस विश्रांती असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना टी 20 सीरिजसाठी काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना- 23 ऑगस्ट, शुक्रवार दुसरा सामना- 25 ऑगस्ट, रविवार तिसरा सामना- 27 ऑगस्ट

मंगळवार दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, फॅबियन ॲलन, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोटी, निकोलस पूरन, शेरफन रुदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.

Exit mobile version