। मुंबई । प्रतिनिधी ।
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये गणला जातो. यावर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात बुमराहने आपल्या कामगिरीने भारताला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला होता. जगातील कोणत्याही अव्वल फलंदाजाला त्याचा सामना करणं कठीण जाते. तसेच, बुमराहच्या गोलंदाजीसह त्याच्या बॉलिंग अॅक्शनचीही बरीच चर्चा होते. अनेक युवा गोलंदाज त्याच्या बॉलिंग अॅक्शनची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जसप्रीत बुमराहच्या अॅक्शनची नक्कल करताना दिसत आहे.
काही आठवड्यांपूर्वी एका पाकिस्तानी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो हुबेहुबे बुमराहच्या बॉलिंग अॅक्शनची नक्कल करत होता. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये बॉलिंग करताना दिसत आहे. या मुलीने बुमराहसारख्या रनअपसह नेटमध्ये गोलंदाजी केली. यावेळी फलंदाजालाही एकही शॉट खेळता आला नाही. सोशल मीडियावर लोक या मुलीला ‘लेडी बुमराह’ म्हणत आहेत. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अॅक्शनला कॉपी करणारी ही मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे, जी न्यू इनिंग्स क्रिकेट एंटरप्राइज अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते. बुमराहप्रमाणे गोलंदाजी करणार्या या विद्यार्थ्यीनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.