| अलिबाग | प्रतिनिधी |
अतिश म्हात्रे यांनी लिहिलेल्या जन्मांतर एक रहस्य ह्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा साई ईन रिसॉर्ट येथे दिमाखात पार पडला. प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान एनकेजीएसबी बँकेच्या अध्यक्षा सीए हिमांगी नाडकर्णी यांनी भूषविले. यावेळी चिंतामणी नाडकर्णी, एनकेजिएसबी बँकेचे उपाध्यक्ष सीए शांतेश वर्टी, सुषमा वर्टी, रोहा मुरुड नगरपालिका सीईओ पंकज भुसे, विश्वास परांजपे, स्मिता परांजपे, आरती म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती.या कादंबरीच्या प्रकाशक शालीना म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. अतिश म्हात्रे ह्यांना लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी घडवले ह्या सगळ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिमांगी नाडकर्णी तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जन्मातर एक रहस्य या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. जन्मांतर एक रहस्य या कादंबरीची प्रस्तावना आणि मनोगत वाचन सिमंतीका वस्त – मोरे यांनी केले व नरेंद्र बोंबटकर ह्यांनी सूत्रसंचालन केले. अतिश म्हात्रे हे एनकेजिएसबी बँकेत, डेप्युटी मॅनेजर या पदावर असून ते अलिबाग शाखेत शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले आहे.