भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील इंदापूर येथील कशेणे गावच्या हद्दीमध्ये गणेश फरसाणच्या समोर, मुंबई- गोवा हायवेवर कार व दुचाकीचा अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.4) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कशेणे गावच्या हद्दीमध्ये गणेश फरसाणच्यासमोर कार व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात विवेक सिताराम सापळे (60), रा. विघवली, ता. माणगांव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीने घरी परत येत असताना माणगांव बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणा-या मारुती एसक्रॉस गाडीवरील चालक आरोपीत अभिजीत गजानन सुतार (25) जि. रत्नागिरी याने आपल्या ताब्यातील गाडी अतिवेगाने, रस्त्याच्या विरुद्ध बाजूने चालवुन विवेक सापळे यांचे ताब्यातील स्कुटीला समोरुन धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फडताडे करीत आहेत.

Exit mobile version