| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील काळुंद्रे जवळील ओएनजीसी सिग्नलजवळ कार आणि बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील चालक जखमी झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस ही केळवणे येथुन पनवेलच्या दिशेने जात होती. एसटी बसला पाठीमागून आलेली कार धडकल्याने यात कारमधील चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.09) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडला. अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.