आगरी वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

110 मुला-मुलींनी घेतला सहभाग; 20 जोडप्यांची यशस्वी चर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या पुढाकारने रविवार (दि.27) वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन नेरळ-कोल्हारे-बोपेले येथील सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्याला वधू-वर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात 110 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. त्यात 20 जोडप्यांची यशस्वी चर्चा झाली असून, पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या आगरी समाजाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वधू-वर मेळाव्यात वधू-वर यांचा परिचय सचिव संतोष जामघरे यांनी करून देत समाजाच्या कमिटीमार्फत 20 वधू आणि वर यांची यशस्वी चर्चा घडवून आणण्यात यशस्वी भूमिका बजावली. यात चर्चा करण्यात आलेल्या वधू-वरांची पुढील बोलणी सुरू करण्यात आली आहे. या आगरी समाजाच्या मेळाव्यासाठी यशस्वी नियोजन अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. यावेळी उपाध्यक्ष अरूण कराळे, शिवाजी खारीक, सचिव संतोष जामघरे, खजिनदार भगवान धुळे, सुनील रसाळ, संजय मिणमीने, राजेश भगत, जयेंद्र कराळे, शंकर भुसारी, शंकर घोंडविंदे, भूषण पेमारे, संतोष ऐनकर, सुप्रिया भगत, प्रविण डायरे, संतोष धुळे, संजय कराळे, अरूण ऐनकर, गणेश लोभी, अरूण वेहेळे, संदीप विरले, विशाल डायरे, निलेश विरले, दिलीप शेळके, ॠषीकेश भगत, केशव तरे, दिनेश गोमारे, अंकुश बदे, अजय शिंगटे, हरिभाऊ धुळे यांच्यासह अनेक समाज बांधवानी वधू-वर मेळावा यशस्वी केला.

गेली अनेक दशके कर्जत तालुक्यातील कळंब आणि माले या दोन्ही गावांमध्ये सोयरीक जमत नव्हती. जर दोन्ही गावांची सोयरीक जमली, तर त्यांचे लग्न समाजाच्या सभागृहात थाटात करण्यात येईल व त्यांचे कन्यादान मी स्वतः करणार आहे.

सुरेश टोकरे,
अध्यक्ष, आगरी समाज संघटना, कर्जत
Exit mobile version