हरियाणा, उत्तरप्रदेशसह पंजाबमधून ठोकल्या बेड्या
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतल्यानंतर आता भारतीय सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी घरभेद्यांकडे मोर्चा वळवला आहे. भारतात राहून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या देशद्रोह्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या आडून हेरगिरी केल्याच्या संशयाखाली ज्योती मल्होत्राला 17 मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी उत्तर प्रदेशच्या एका व्यावसायिकाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याचं नाव शहजाद आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सनं त्याला मुरादाबादमधून अटक केली. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
तस्करीशी संबंधित गोपनीय माहिती मिळाल्यापासूनच शहजादवर नजर ठेवली जात होती. तो अनेकदा पाकिस्तानला गेला असल्याचं तपासातून समोर आलं. तो कॉस्मॅटिक, मसाले आणि अन्य वस्तूंच्या अवैध व्यापाऱ्यांमध्ये त्याचा सहभाग होता. तो व्यवसायाच्या आडून आयएसआयसाठी सीक्रेट मिशन राबवत होता. आयएसआयच्या अनेक एजंट्सच्या संपर्कात राहिल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील, गोपनीय माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शहजाद केवळ गोपनीय माहितीच देत नव्हता, तर भारतात आयएसआयच्या विविध मोहिमा पार पाडण्यातही त्याची भूमिका महत्त्वाची होती.
आयएसआयच्या आदेशांवरुन काम करणाऱ्या शहजादनं भारतात सक्रिय असलेल्या पाकिस्तानच्या एजंट्सना आर्थिक रसद पुरवायचा. तो रामपूर जिल्हा आणि उत्तर प्रदेशच्या अन्य भागांमधील लोकांना आयएसआयसाठी काम करण्यासाठी पाकिस्तानला पाठवायचा. त्यांच्यासाठी व्हिसा आणि प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रं तयार करण्याची कामगिरी पार पाडायचा. त्यासाठी तो आयएसआय एजंट्सच्या मदत घ्यायचा.
भारतीय सिम कार्ड्स खरेदी करुन ते आयएसआयच्या एजंट्सना दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. लखनऊच्या एटीएसनं त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 17 मे रोजी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सगळे आरोप हरियाणा आणि पंजाबच्या विविध भागांत राहणारे आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा समावेश आहे. देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप तिच्यावर आहे.
पंजाबमधून गजाला, यमीन मोहम्मदला अटक
पोलिसांनी सर्वात आधी पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मदच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवी दिल्लीतील पाकिस्तान वकिलातमध्ये काम करणारा दानिश या दोघांना भेटायचा अशी बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर दानिशने या दोघांना ऑनलाईन पैसेही पाठवल्याचे समोर आले आहे.
हरयाणातून नोमान इलाहीला अटक
14 मे रोजी पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नोमान इलाहीला अटक केली आहे. नोमान पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्कात होता, त्यांना नोमानने संवेदनशील माहिती दिली होती.
हरियाणातून देविंदर सिंह ढिल्लोंला अटक
हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातून देविंदर सिंह ढिल्लोंला अटक करण्यात आली आहे. देविंदर सिंहने हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला माहिती दिली आहे. देविंदर सिंह हा पाकिस्तानमधील करतारपूर साहिब, ननकाना साहिब या धार्मिक ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा तो आण्एसआयच्या संपर्कात आला होता.
नूहमधून अरमानला अटक
नूहमधून अरमानला अटक करण्यात आल आहे. अरमान व्हॉट्सॲपवरून पाकिस्तानला माहिती पुरवत होता. पोलिसांनी याप्रकरणी अरमानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
युट्युबर प्रियंका सेनापतीची चौकशी
पुरी येथे राहणारी युट्युबर प्रियंका सेनापतीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ज्योती मल्होत्रा पुरी येथे गेली होती आणि दोघींची भेट झाली होती. ज्योतीने केलेल्या हेरगिरीत प्रियंकाने काही मदत केली होती की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
युट्युबर नवांकर चौधरीवर आरोप
युट्युबर नवांकर चौधरीवरही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे आरोप आहेदत. चौधरीने आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
उत्तर प्रदेशमधून शहजादला अटक
उत्तर प्रदेशमधून व्यावसायिक शहजादला मुरादाबादमधून अटक केली आहे. शहजादने राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवले होते.
जालंधरमधून मोहम्मद मुर्तजा अलीला अटक
गुजरात पोलिसांनी जालंधरमधून मोहम्मद मुर्तजाला अटक केली आहे. मुर्तजा हा आयएसआयसाठी हेरगिरी करायचा, त्याच्याकडून चार मोबाईल आणि तीन सिम कार्ड जप्त केले आहेत.
ज्योती मल्होत्राला अटक
युट्युबर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला गेली होती. ज्योती पाकिस्तानच्या वकिलातात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
पाकिस्तानात 14 दिवस प्रशिक्षण
भारताची संवेदनशील माहिती ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली. तिच्याबद्दल आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणानंतर, तिला येथून पुढील मोहिमेसाठी भारतात पाठवण्यात आले. पण मिशन सुरू करण्यापूर्वीच तिला हरियाणा पोलिसांनी पकडले. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. या काळात तिने मुरीदकेमध्येच 14 दिवस घालवले. हरियाणातील हिसार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खुलासा ज्योतीने स्वतः चौकशीदरम्यान केला. मात्र, या चौकशीतून अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, ती मुरीदकेहून कोणत्या मोहिमेवर भारतात परतली होती.