दुचाकीस्वारांकडून एसटी बस चालकाला मारहाण; रामवाडीतील घटना, व्हिडिओ व्हायरल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पेणकडून अलिबागकडे येणाऱ्या एसटी बस चालकाला रस्त्यात थांबवून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्याची घटना रामवाडी येथे घडली. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या चालकाचा डोळा सुदैवाने बचावला आहे.
स्वप्नील भगत राहणार वाडगाव असे या अलिबाग येथील एसटी चालकाचे नाव आहे. रामवाडी, पेण येथे दोन मुलांनी बस अडवून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करून रक्तबंबाळ केले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून मोठी जखम असल्याने चार टाके पडले आहेत. ह्या घटना नेहमीच एसटी चालकांबाबत होत असल्याने एसटी कर्मचारी संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version