। अलिबाग । प्रतिनिधी ।
पावसाने रात्रीपासून जोर धरल्याने पाली-सुधागडमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पालीकडे जाणाऱ्या तीन शाळेच्या फेऱ्या व एक रोहा-पुणे एसटी बस फेरी रद्द केली असल्याची माहीती रोहा एसटीबस आगारातून दिली आहे .
रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस कालपासून सुरू झाला आहे या पावसामुळे रामराज-बोरघर पूलावरून पाणी वेगाने वाहत असल्याने रामराजकडे जाणाऱ्या फेऱ्या बंद केल्या आहेत. तसेच पाली-सुधागडमध्ये सखल भागात पाणी साचल्याने रोह्यावरून पूणे जाणारी बस फेरी व तीन शालेय फेऱ्यांची बसेस रदद केल्या आहेत. या पावसामुळे एसटीबस सेवेवर परिणाम झाला आहे.