एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

बोनससह फेस्टिवल ॲडव्हान्सही मिळणार; एसटी महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. दिवाळीपूर्वीच बोनस आणि फेस्टिवल ॲडव्हान्स (सण उचल) देण्यात आला आहे. त्यामध्ये 200 हून अधिक कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ॲडव्हान्स देण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित एसटी बस आगार असून, 19 बस स्थानके आहेत. जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये चालक व वाहकांची संख्या अधिक आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारपेठा फटाके, दिवाळी साहित्यांनी सजल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने यावर्षी बोनसह फेस्टिवल ॲडव्हान्सची घोषणा केली होती. त्यानुसार, रायगड जिल्ह्यातील दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी दिवाळी फेस्टिवल ॲडव्हान्सचीी मागणी केली होती. या मागणीनुसार कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपयांचे फेस्टिवल ॲडव्हान्स देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती जिल्हा नियंत्रक सुहास चौरे यांनी दिली. दिवाळीपूर्वीच फेस्टिवल ॲडव्हान्स आणि बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस आणि फेस्टिवल ॲडव्हान्स देण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया वित्त विभागामार्फत राबविण्यात आली आहे.

– सुहास चौरे, जिल्हा नियंत्रक

Exit mobile version