। कर्जत । वार्ताहर ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदमधील दहा कर्मचार्यांना मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सेवेत कायम केले आहे. सर्वच कर्मचारी या सेवेला न्याय देतील, निष्ठ्ने आपले कर्तव्य बजावतील यात मला कोणतीही शंका नाही असे मुख्याधिकारी भणगे यांनी यावेळी सांगितले.
नगरपरिषद प्रशासनात मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकूण दहा कर्मचार्यांना सेवेत कायम केले आहे यामध्ये आठ सफाई कर्मचारी आणि दोन कार्यलयीन क्लार्क यांचा समावेश आहे. तत्कालीन माथेरान कौन्सिलने या सर्वाना कायम करण्यासाठीचा ठराव केला होता. तसेच तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक रत्नादीप प्रधान,आस्थापना विभागाचे जयंत वर्तक, सदानंद इंगळे यांचे देखील आभारी आहे की, या सर्व कर्मचार्यांच्या नियुक्तीचे आदेश तयार करण्यासाठी, सर्व कागद पत्राची पूर्तता केल्यामुळे हे शक्य झाले आहे.