झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

। पोयनाड । प्रतिनिधी ।
पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्षा खालील मुलांसाठीच्या क्रिकेट स्पर्धेला शानदार कार्यक्रमाद्वारे प्रारंभ करण्यात आले. झुंझार युवक मंडळातर्फे युवा क्रिकेट खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एक दिवसीय, 40 षटकांचा फॉरमॅट स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. नियोजनबद्ध आयोजन, भरघोस बक्षिसे, शिस्तबद्ध नियमांचे पालन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृती चषक प्रथम क्रमांक, निहालशेठ अग्रवाल यांच्याकडून द्वितीय क्रमांक, राधादामोदर सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अ‍ॅड.प्रथमेश पाटील यांच्याकडून तृतीय क्रमांक, आरपीएल क्रिकेट लिगचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या कडून चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, शिवसेना संघटक सतिष पाटील, पोयनाडच्या सरपंच शकुंतला काकडे, अलिबाग तालुका व्यापारी सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शेकापचे युवा नेते तथा माजी सरपंच भूषण चवरकर, अ‍ॅड.महेश म्हात्रे, अ‍ॅड.कौस्तुभ पुनकर, अ‍ॅड.गौरव लेले, सागर कांबळे, संदेश गुंजाळ, निहाल चवरकर, दिलीप काकडे, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सुजित साळवी, अजय टेमकर, संतोष चवरकर, इम्रान बुराण, पंकज चवरकर, परेश चवरकर, अजित चवरकर, अविनाश सावंत, अ‍ॅड.पंकज पंडित आदी मान्यवर होते.

Exit mobile version