| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच पार पडला. गाईड विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहा तालुक्यातील वराठी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्षा हिरामण दळवी यांना पुरस्कार देण्यात आला.
शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील टाटा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट नरिमन पॉँईट येथे हा कार्यक्रम झाला. वर्षा दळवी या शिक्षिकाअसून गेली 18 वर्षे जिल्हा परिषद शाळांमधून गाईड विभागातून काम करीत आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह, रन फॉर युनिटी, तंबाखूमुक्त शाळा वाचन प्रेरणा, कार्यानुभव कार्यशाळा, अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. त्या तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षिका असून स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यातून उत्कृष्ठ जिल्हा मेळावा संचालक म्हणून कामगिरी बजावली आहे.