मुरुड-मजगावचा समीर माळी प्रथम
| कोर्लई | प्रतिनिधी |
महाड येथील श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय गडारोहण स्पर्धा-2026 स्पर्धेत मुरुडच्या पुरुष गटात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुरुड विभागाचे ध्वजधारी धारकरी मजगांव येथील समीर नरेश माळी यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती, महाड आयोजित राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धेत पुरुष खुला गट यात पहिला क्रमांक पटकावल्या बद्दल छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी रायगडावर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांच्या हस्ते समीर नरेश माळी यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
