अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

| म्हसळा | वार्ताहर |

सकलप, खारगावखुर्द ग्राम पंचायत हद्दीतील दिघी रोड येथे समुद्राकडे जाणारा रस्ता खासगी जमीन मालकाने बांधकाम करून बंद केला असल्याने तो मोकळा करून मिळण्यासाठी गावातील शिष्टमंडळाने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. येथे हिंदु समाज परंपरेनुसार पूर्वापार नारळी पौर्णिमेला शासकीय इतमामात समुद्राला नारळ अर्पण करून पूजापाठ केली जाते. तसेच, गणेश मुर्ती विसर्जन करतात. असे असताना विसर्जन घाटावर माती भराव करून व पक्के बांधकाम करुन कायम बंद केला असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

निवेदन देतेवेळी माजी सभापती महादेव पाटिल, सुरेश कुडेकर, अनंत नाक्ति, महादेव म्हात्रे, काशिनाथ पाटील, कृष्णा म्हात्रे, कानु लोणशिकर, संजय लोणशिकर, सुबोध पाटील, बाबु खोत, योगेश मेंदाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version