| मुंबई | प्रतिनिधी |
जागतिक कमकुवत संकेत तसेच खासगी बँक आणि ऑटो शेअर्स घसरणीचा फटका मंगळवारी शेअर बाजाराला बसला. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 1,100 अंकांनी घसरून 76,200 पर्यंत खाली आला. तर निफ्टी 344 अंकांनी घसरून 23,050 च्या खाली घसरला. सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्स-निफ्टी घसरले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची ही आजची घसरण प्रत्येकी 1.4 टक्के एवढी आहे. दरम्यान, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 9.8 लाख कोटींनी कमी होऊन 407 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.