। मुंबई । प्रतिनिधी ।
राजकीय परिस्थिती आणि नव्या सरकारमध्ये शिंदे आणि त्यांच्या पक्षाची होत असलेली फरफट यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी निशाण साधला आहे. शिंदे गटाने आता डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी, असा टोला दानवे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती शिंदे गट बाद. 2. उद्योग विभागाचे निर्णय शिंदे गट बाद. 3. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक शिंदे गट बाद. अशी उदाहरणे देत सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तसेच, तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे, असे अंबादास दानवे यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.