। पनवेल । वार्ताहर ।
बेकायदेशीररित्या देशी दारुच्या बाटल्या किराणा दुकानात विकणार्या एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात देशी दारु संत्रासह इतर ऐवज हस्तगत केला आहे. मनोहारी रॉय (40) हा इसम स्वतः जवळ बेकायदेशीररित्या देशी संत्रा दारु व इतर ऐवज असा मिळून 2 हजार 670 रुपये किंमतीचा ऐवज जवळ बाळगून त्याच्या याशिका जनरल स्टोअर्स पुष्पक नगर करंजाडे सेक्टर 1 या किराणा दुकानात विकत असल्याची माहिती सपोनि चौधरी यांना मिळताच त्यांच्यासह शरद ढोले, पो.शि.महेंद्रकुमार धनगर व पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला आहे.