मुरुड आगार व्यवस्थापकांचा अजब कारभार

। कोर्लई । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगार अनेक समस्यांनी चर्चेत असताना साखर चौथ गणपती विसर्जनानंतर एका समस्येने व्यवस्थापक राहुल शिंदेंचा अजब कारभार उघड झाला आहे. रविवार, दि.22 सप्टेंबर रोजी जादा प्रवासी असतानाही जादा गाडी सोडण्यास नकार देणार्‍या निष्क्रिय आगार व्यवस्थापकांची बदली करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या डेपोमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्या ठिकाणी मुरुड पोलीस निरीक्षक उदय झावरेंच्या मध्यस्थीमुळे प्रवाशांना गाडी उपलब्ध करून देण्यात आली आणि अखेर प्रवाशांनी मुरुड पोलीस निरीक्षकांचे आभार मानले व आगार व्यवस्थापकांची बदली करण्याची मागणी केली आहे.
सदर घडलेल्या घटनेच्या दिवशी अनेक प्रवासी बुकिंग न मिळाल्याने परत जात होते. त्यावेळी मुरुडचे महेश कारभारी यांनी आगार व्यवस्थापकांना सूचना दिली होती की आज जादा प्रवासी भरपूर असल्याने एक जादा गाडी सोडावी.

Exit mobile version