खालापूरात पेंढ्याच्या गंजीला आग; 3 लाखाचे नुकसान

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापुर तालुक्यातील धामणी गावात विद्युत वाहिनी झाडाच्या फादीला स्पर्श होऊन ठिणगीमुळे गुरांसाठी साठवण करून ठेवलेली पेंढ्याची गंजी व माच जळून खाक झाली. येथील दुग्ध व्यवसाय करणार्या मालकावर उत्पादन देण्यार्या म्हशी ना वैरण देण्याची प्रश्‍न समोर आल्याने या ठिकाणी आगीत जवळपास 6 हजार पेंडा जळाल्याने जवळपास 3 लाखाचे नुकसान झाले आहे. या बाबत विद्युत मंडळाने भरपाई देऊन या दुग्ध व्यवसायिक मालकाला आधार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर रोजी सोसायट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे धामणी गावात उमेश सटूराम चिले हे दुग्ध व्यवसाय करीत असल्याने म्हशी व गायी ना खाण्या पिण्याची व्यवस्था म्हणून 5 रुपये किमतीने एक पेंडा खरेदी केला. 6 हजार पेंडया ची गंजी व माच रचून ठेवले असताना सुटलेल्या वार्यामुळे विद्युत वाहिन्या एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्क झाल्याने ठिणगी उडून गंजीला आग लागली. आगीचा भडका वाढतच गेल्याने तात्काळ पाण्याच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पेंडया माच रचलेली लाकडी खांब असल्याने आगी वाढतच गेली. जवळपास 6 हजार पेंडयाची गंजी जळून खाक झाली. त्यामुळे उमेश चिले कुटुंबाचे दुग्ध व्यवसाय अडचणीत आले असून गायी म्हशी ना वैरण कसे पुरवायचे हा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे विद्युत मंडळाकडून भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे

Exit mobile version