कर्जतमध्ये कडकडीत बंद

| कर्जत | प्रतिनिधी |

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि.23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस प्रशासन, व्यापारी फेडरेशन तसेच विविध सामाजिक, व्यापारी व नागरिक संघटनांना सहकार्याची विनंती करणारी निवेदने देण्यात आली. त्याप्रमाणे कर्जत बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.

निट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दि. 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या अनुषंगाने कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना शांततापूर्ण आंदोलनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. तसेच व्यापारी फेडरेशन, व्यापारी संघटना व इतर सामाजिक संस्थांना समाजहित व विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Exit mobile version