दोन दिवस जिल्ह्यात कडक लॉकडावून


वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात 9 जून ते 11 जून 2021 पर्यंत तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस म्हणजे गुरुवार 10 व शुक्रवार 11 जून रोजी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अतिवृष्टीमध्ये होणारी जीवित व आर्थिक हानी टाळण्यासाठी गुरुवार 10 जून व शुक्रवार 11 जून 2021 ला सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त दवाखाने, रुग्णालय, मेडिकल, पॅथॉलॉजी सुरु राहतील. तसेच सर्व शासकीय कार्यालयेही या कालावधीत सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version