विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

इसालवाडी राजिपची शाळा बंद
| पाताळगंगा | वार्ताहर |
चौक बाजारपेठेपासून चार कि.मी. अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेली राजिपची ईसाळवाडी शाहा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यामुळे पालकांमधून नाराजीचा सूर उमठत आहे. शाळा सुरु होण्यासाठी पालकांनी शासकीय उंबरठे झिजवले. मात्र, पदरी निराशेशिवाय काहीच नाही. सरकारकडून ‘पढोगे इंडिया, तो बडोगे’चा नारा दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शाळाच बंदच असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दरम्यान, शाळेची पटसंख्या घटल्यामुळे ती बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, आज त्या वाडीमध्ये असणारी जवळपास 10 ते 15 मुले शिक्षणांपासून वंचित आहेत. काही विद्यार्थी चार कि.मी.ची पायपीट करुन चौक येथे शिक्षण घेण्यासाठी जात आहेत,तर काहींना आश्रमशाळेत टाकण्यात आले आहे. आपल्या मुलांना शाळेय शिक्षण मिळावे. त्यांनी अशिक्षित राहू नये. मात्र, गावापासून असलेली शाळा खूप लांब असून, विद्यार्थ्यांना रोज चालत जाणे शक्य नाही. यामुळे बंद पडलेली शाळा सुरु झाल्यास चौकसारख्या ठिकाणी न येता गावातच त्यांना शिक्षण मिळाल्यास मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

राजिप शाळा ईसाळवाडी सुरु झाली असती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नसते. यामुळे नाईलाजाने आम्हाला मुलांना माणगाव, चिखले, पनवेल आश्रमशाळेत टाकावे लागले. मुले डोळ्यासमोर नाही ही खंत मनाला लागून राहत आहे. या ठिकाणी 40 घरांची वस्ती आहे. -जगदीश पारधी, पालक ईसाळवाडी

Exit mobile version