श्रमदानातून विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

| म्हसळा | वार्ताहर |

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेजवळ वाहत असलेल्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे व श्रमदानाचे महत्त्व निर्माण व्हावे यासाठी बंधार्‍याची निर्मिती करावी असे विचार विद्यालयाचे प्राचार्य हाके यांनी मांडले. स्काऊट गाईडचे प्रमुख पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्रमदान, शेती याविषयी महत्व पटवून दिले. हा उपक्रम राबवण्यासाठी इयत्ता दहावीचे स्काऊट गाईडचे विद्यार्थी व इ 9 वी च्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक गायकवाड, गवळी, आमले, वसावे, कामडी व जंगम काका यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version