। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील खरवली येथे देशी व विदेशी नाणी-नोटांचे प्रदर्शन सोमवारी (दि.24) पार पडले. यादरम्यान, संस्कारधाम विद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन चलनांचा इतिहास आणि वापर जाणून घेतला. एम्बायो प्रा. लि. कंपनीतील संशोधन विभागाचे प्रमुख डी.व्ही पी. किशोर यांनी मागील 15 वर्षांपासून पत्नी वरलक्ष्मी व कन्या नितिश्री यांच्या सहयोगाने भारतासह तब्बल 120 पेक्षा अधिक देशांच्या नाणी, नोटा व पोस्टल तिकीटांचा संग्रह व माहितीचे जतन केले आहे. या नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनावेळी किशोर यांनी आपल्या संग्रहाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचे समाधानही केले. या प्रदर्शनाला मंदार माईणकर, दीप सकपाळ, भगवान जाधव, अमोल गायकवाड, संतोष चौधरी, नारायण राव यांचे अनमोल सहकार्य लाभले.