। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यात सध्या वालाचा हंगाम सुरु झाला असून शेतकरी वाल्यांच्या शेंगा घेऊन मुरुड बाजारात दाखल झाले आहेत. वालाच्या व चवळीच्या शेंगा तसेच कलिंगडासाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त असतो. थंडीत पडणार्या दवावर हे पिक तयार होते. यावेळी थंडी जास्त असल्याकारणाने हे पिक मागील वर्षापेक्षा जास्त पिक घेईल असा अंदाज येथील शेतकरी वर्ग करीत आहे. हे पिक तयार होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागतो. मात्र, यावेळी खूप थंडी असल्याकारणाने वालाच्या व चवळीच्या शेंगांचे पिक लवकर येऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पोपटी बनविण्यासाठी वालांच्या शेंगांना खूप मागणी आहे. त्यामुळे या वालाच्या शेंगांची एक पायली 150 ते 200 रु. अशी विक्री केली जात आहे.