। अलिबाग । वार्ताहर ।
डिफेन्स अकॅडमीच्या सेल्फ डिफेन्सच्या प्रथम व द्वितीय डीग्री परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून डिग्री प्राप्त केली. अलिबाग-रेवस रोडजवळील कोकोमँगो रिसॉर्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिफेन्स अकॅडमीचे संस्थापक शैलेंद्र शेलार, संस्थापक प्रशांत म्हात्रे, संस्थापक सनी शेलार व संस्थापक अनिकेत म्हामुनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच अक्षय पाटील, हर्षल अहिरे, करण इखारे आणि अमिषा भगत हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले.
या परीक्षेमध्ये शुभम शिंदे, प्रतीक्षा पुरो व आदेश अतुल तास्कर यांनी द्वितीय, तर ओवी नाईक, मोहम्मद हुसैन, दृष्टी डाकी, महावीर जाट, शैतान सिंघ दसाना, सत्यजीत शिराले, सक्षम बेलोस्कर, अदविका पालवे, दिवीत नाईक, अवधूत घोरपडे, अंतरा जाधव, अनुश्री प्रधान, श्रेया शिंदे, मनस्वी शेलार आणि जुई वानखेडे यांनी प्रथम डिग्री प्राप्त केली. तर अरहान हुसैन याने 85 पैकी 57 गुण मिळवून लहान गटात, तर अंतरा जाधव हिने 145 पैकी 102 गुण मिळवून मध्यम गटात आणि शुभम शिंदे याने 245 पैकी 203 गुण मिळवून मोठ्या गटात बेस्ट परफॉर्मर ट्रॉफी मिळवली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.