| उरण | वार्ताहर |
सिटी ऑफ मोरायफिल्ड, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया येथे 7 जुलै ते 10 जुलै 2023 या कालावधीत होणार्या वर्ल्ड तायक्वॉन्डो प्रेसिडेंट कप, ओशनिया पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी पंच म्हणून भारतातून एकमेव आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच कॉमनवेल्थ तायक्वॉन्डो युनियनचे सदस्य सुभाष पाटील यांची निवड झाली आहे.
सुभाष पाटील हे सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्या आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात सहभागी होऊन तायक्वॉन्डो मधील नवीन नियम अनुभव शिकत असतात. या सेमिनार प्रशिक्षणातून मिळणार्या ज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त खेळाडूंन पर्यंत पोहोचण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदके मिळवले आहेत. भविष्यात अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर भूषवतील असे सुभाष पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सुभाष पाटील हे 4 जुलै रोजी ऑस्ट्रेलिया येथे रवाना झाले आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी तायक्वॉडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.