| आपटा | वार्ताहर |
रसायनी ब्राह्मण संघातर्फे कोंठीबा येथे वृषारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जवळपास आठरा सदस्यांनी वनवासी कल्याण आश्रम येथे जावून तीस झाडे व रोपे लावली यामध्ये आंबा नारळ पेरू जांभूळ लिंबू या रोपाची लागवड केली. यावेळी वनवासी कल्याण आश्रम कोठीबाचे व्यवस्थापक विनायक जोशी रसायनी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष बी एस कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सुचेता जोशी, धंनजय जोशी, शिल्पा आपटे, श्रीमती आपटे, श्रीमती ओक, मानेगावकर सौ मानेगावकर, विवेक जोशी, संतोष सोमण, श्रेया आपटे इत्यादी सर्व सहभागी झाले होतेविनायक जोशी यांनी आश्रमाचे कामकाज कसे चालते याबाबतीत सर्व माहिती दिली व तेथे तयार करण्यात आलेली घरगुती व उपयोगी वस्तू याबाबतीत माहिती दिली. यावेळी वनभोजनाचा आंनद घेता आला व कडाव गणपती मंदिर व पळसदरी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले.