कराटे स्पर्धेत मुरुडच्या विद्यार्थ्यांचे सुयश

| कोर्लई । वार्ताहर ।

अलिबाग येथील नेहूली क्रीडा संकुलात नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सिको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया मुरुड क्लासच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत सुयश मिळविल्याबद्दल सर्वत्र कौतुक केलेे.

कलिका सिंगे हिने कास्य पदक, रजत पदक, प्रार्थना कौलकर दोन कास्य पदक, स्वरूप पवार सुवर्ण पदक, कास्य पदक, वैभवी घोगेवाड दोन रजत पदक, ईशान विरकूड – कास्य पदक, रजत पदक, अस्मि भायदे दोन रजत पदक, वरद मोहिते सुवर्ण पदक, कास्य पदक, सार्थक कौलकर दोन रजत पदक, सई फुलमाळी कास्य पदक, रजत पदक, सुमित घोगेवाड दोन रजत पदक, यासिन मणियार दोन रजत पदक, आराध्य नाईक दोन रजत पदक या सर्व कराटेपट्टूना जिल्हा कराटे मुख्य प्रशिक्षक रुपेश दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version