राहुलवर यशस्वी शस्त्रक्रिया

| मुंबई | वार्ताहर |

केएल राहुलला एक मे रोजी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. आरसीबीविरोधात फिल्डिंग करताना केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला तो मुकला आहे. दरम्यान, केएल राहुलच्या मांडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, राहुलने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. दरम्यान, दुखापतीमुळे केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकणार आहे. पण आशिया कप आणि एकदिवसीय विश्‍वचषकापूर्वी तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Exit mobile version