तुराडे आदिवासीवाडीतील तरूणाने घेतला गळफास

। रसायनी । प्रतिनिधी ।

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील तुराडे आदिवासीवाडी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल काळूराम वाघमारे असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे.

तुराडे आदिवासीवाडी येथील सुनिल वाघमारे याने अज्ञात कारणामुळे धापड्याची माळ येथील करंजाच्या झाडाला नॉयलॉनच्या रस्सीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याला ग्रामीण रूग्णालय चौक येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत रूपेश काळूराम वाघमारे याने रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद जाधव अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version