| रायगड | प्रतिनिधी |
पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. राहुल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राहुल सध्या अलिबाग येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. सुधागड पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी असताना त्याने तिथंच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. मागील काही दिवसांपासून तो वैद्यकीय रजेवर होता. राहुल याने आत्महत्येचा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत.