| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगर पंचायतीच्या पहिल्या विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर मोरे व शेकापचे सुमेध खैरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6, शेकापचे 4, शिवसेना 4, भाजप 2 व अपक्ष 1 असे एकूण 17 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे एका स्वीकृत नगराध्यक्ष निवडीसाठी शेकाप व शिवसेनेचे समसमान नगरसेवक असल्याने चुरस होती. मात्र एका अपक्ष नगरसेवकाने शेकापला पाठींबा दिल्याने शेकापचे पारडे जड झाले आणि शेकापला स्वीकृत नगरसेवक पद मिळाले. यावेळी नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, जिप सदस्य सुरेश खैरे, ग. रा. म्हात्रे सर्व नगरसेवक, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाली स्वीकृत नगरसेवकपदी शेकापचे सुमेध खैरे, राष्ट्रवादीचे मोरे
