सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

| पुणे | प्रतिनिधी |

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, भाजपाचे मंत्री चंद्रकांत बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “दादा गेलेत हे आजही मला मान्य नाही. बारामती हा त्यांचा श्वास होता आणि त्यांचा शेवटचा श्वासही बारामतीतच विसावला,” असं सांगताना त्या भावुक झाल्या. “माझं दुःख मी मनात दडपून ठेवलं आणि तुमच्याकडे बघून मला धीर आला,” असंही त्या म्हणाल्या.

Exit mobile version