| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा पुलानजीक गेल्या काही वर्षांपासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून जा-ये करणाऱ्या इतर लहान-मोठ्या बोटी, बार्ज यांना धोकादायक ठरत आहे.
ही बार्ज समुद्र भरतीच्या वेळी पूर्णतः पाण्यात बुडत असल्याने रेवदंडा समुद्रकिनारी परगावाहून ये-जा करत असलेल्या लहान-मोठ्या बोटी, बार्ज यांच्या निदर्शनास येत नाही. परिणामी, या बार्जला धडक बसून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधितानी सदर बार्ज समुद्रातून काढण्याची खबरदारी घेतली नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत रेवदंडा बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, समुद्रात बुडालेली बार्ज काढून घेण्याबाबत संबंधित बार्ज मालकास सूचना केली आहे. परंतु, याबाबत बार्ज मालकांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य अद्यापि दिलेले नाह, अशी माहिती दिली.