| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) या संघटनेची कार्यकारणीची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.11) रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पोसतांडेल यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी गिरीश डुबेवार, सरचिटणीस पदी अनिल पवार, कोषाध्यक्ष लालू सोनकांबळे, कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर वाघमारे, प्रमुख मार्गदर्शक व कोर कमिटी सदस्य दीपक रोडे, विश्वनाथ घुगे, धर्मा खिल्लारे, संघटक विजय भोंडवे व इतर पदाधिकार्यांची नेमणूक करण्यात आली. उरण नगर परिषदेचे अधिकारी सुरेश पोसतांडेल हे मन मिळावू, अभ्यासू वृत्तीचे असून प्रशासकीय सेवेचा त्यांना प्रदीर्घ व उत्तम अनुभव आहे. संघटनेच्या माध्यमातून कामगार वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच मेहनत घेत असतात. कामगार वर्गातून सुरेश पोसतांडेल यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. कार्याध्यक्ष नितीन कासारे, उरण शाखाध्यक्ष संतोष रायगड जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव, रायगड जिल्हा तेलंगे, शहर सरचिटणीस विजय पवार, शाखा उपाध्यक्ष हर्षद कांबळे, कोषाध्यक्ष संजय पवार, खजिनदार महेश जाधव आदी उरण नगर परिषदेच्या पदाधिकारी कर्मचार्यांनी सुरेश पोसतांडेल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले
सुरेश पोसतांडेल यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
