| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
फेसबुक फ्रेंडने इंग्लंडमधून सरप्राईज म्हणुन पाठविलेले गिफ्ट कस्टम मधून सोडविण्यासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 1 कोटी 12 लाख रुपये गमावण्याची वेळ अलिबाग मधील एका महिलेवर ओढवली. विशेष म्हणजे, यासाठी तिने चक्क कर्जदेखील काढले. त्यानंतर ना गिफ्ट मिळाले ना पैसे त्यामुळे या महिलेने पोलिसात आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे.
अलिबाग येथे राहणारी एक महिला 2021 ला कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाल्या. एके दिवसी त्यांनी इंग्लंडमधून आलेली एका इसमाची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली. रोज चॅटिंग करत त्या इसमाने या महिलेचा विश्वास संपादन केले. आपल्या जाळ्यात सदर महिला पुरती फसली आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली.
इंग्लंडमधून तुला सरप्राईज म्हणुन गिफ्ट पाठविले असल्याचे तिला सांगण्यात आले. कस्टम ऑफीस, दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता, गिफ्ट टॅक्स, गिफ्ट मध्ये असलेली करन्सी एक्सचेंज टॅक्स, त्याचप्रमाणे गिफ्ट पार्सल मध्ये सोने व करंन्सी असुन भारतीय चलनात त्याची किमत 99 लाख रुपये असल्याचे पटवून देण्यात आले. या कारस्थानात आरोपीसोबत आणखी सहाजण सहभागी आसल्याचे समोर आले आहे.
गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादी याचे खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकुण किती पैसे भरायची आहे याबाबत सांगीतले. इतकी मोठी रक्कमेची समोरुन अनोळखी माणसं मागणी करत असतानाही, या महिलेला संशय आला नाही. तीने त्यासाठी अलिबाग येथील बॅक महाराष्ट्र, स्टेट बॅक ऑफ इंडीया या बॅकामधील पेशन खाते, बचत खात्यातुन तसेच सोने तारण ठेवुन कर्ज काढुन तब्बल 1 कोटी 12 लाख 92 हजार 800 इतकी रक्कम त्या इसमाच्या खात्यांमध्ये जमा केली. सदर महिला यात पुर्णपणे फसली गेली.
यानंतर तिला नाही कुठले गिफ्ट मिळाले, नाही गेलेले पैसे. यानंतर समोरचा इसम गायब झाला होता. शेवटी या महिलेले अलिबाग पोलीसात धाव घेतली आहे. पोलीसांनी भा.दं.वि.क. 420, 406, 34 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल लाड करीत आहेत.