| हिंगोली | वृत्तसंस्था |
सारथीला जे मिळाले ते ओबीसींना द्या, तसेच सापडलेल्या तीन कोटी कुणबी नोंदींना स्थगीती द्या, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केली. हिंगोलीत ओबीसींचा मेळावा पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
उपोषण करणाऱ्या नेत्यांसोबत फिरणाऱ्या 3-4 लोकांना पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी तयार केलेले एफआयआर माझ्याकडे आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण जाळपोळीसारख्या कृत्यांना माझा विरोध आहे, असे ते म्हणाले. गावबंदी करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा अशी मागणी त्यांनी केली.
मराठा समाजाचे एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही. सर्वांच सर्वेक्षण करा. मराठा समाज मग इतरांपेक्षा मागास असेल तर त्यांना आरक्षण द्या. मंडल आयोगाने सांगितले आहे की आम्ही 54 टक्के आहोत. बावनकुळे, पवार साहेब, अजीतदादा म्हणतात जणगनना करा, मग करा जणगनना एकदाची. होऊन जाऊ द्या दुध का दुध पाणी का पाणी, असे छगन भुजबळ म्हणाले.
लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागते, असे जरांगे म्हणाले होते. याचा भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. महात्मा फुलेंची लायकी होती म्हणून त्यांनी शिवरायांची समाधी शोधली. शिवरायांचा दुसरा पोवाडा अमरशेख यांनी रचला. आएएस, आयपीएसमध्ये मोठ्या टक्क्याने मराठे आहेत. मंत्रालयात कॅडरमध्येही मोठ्या टक्केवारीने मराठे आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.