| पेण | संतोष पाटील |
पेणनजीक असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आले.गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.यामुळे परिसरात खळबळ माजली.
याबाबतचे वृत्त समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार,तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी ताततीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या जिलेटन कांड्या नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते.या कांड्या वाहून आल्या की कुणी टाकल्या याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक एकेरी स्वरुपात सुरु केली.