रेवदंडा किनारी संशयास्पद टाकी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा समुद्र किनारी संशयास्पद टाकी वाहून आली.मात्र तपासांती ती टाकी ज्वलनशील नसल्याचा रेवदंडा पोलिसांनी निर्वाळा दिला आहे. बुधवारी सायकांळच्या सुमारास पाण्यात वाहून आलेली टाकी आढळून आली, यावेळी तेथेच उपस्थितांनी लागलीच रेवदंडा पोलिसाना कळविले. रेवदंडा पोलिसांनी ताबडतोब ती टाकी, ताब्यात घेतली, व तपासणी केली, ही टाकी रिकामी असल्याचे आढळून आले, ही टाकी 13.6 किलो वजनाची असून त्यामध्ये गॅस भरला जात असून रेवदंडा समुद्र किनारी ती रिकामी स्थितीत वाहून आली आहे. सदर टाकी मधील पदार्थ ज्वलनशील नसल्या बाबत टाकी च्या वर नमुद केले आहे.

Exit mobile version