सुवर्णकार मंडळाचे स्नेहसंमेलन संपन्न

। अलिबाग । वार्ताहर ।

नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ नवीन पनवेल येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या निमित्ताने, वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी तसेच सभासद विशेष गुणगौरव, मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार, श्री राम तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संजय खरोटे, हेमकांत सोनार, ऋषिकेश थोरात, विजय भामरे, सी.डी. मोरे व समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच, मंडळाचे दिवंगत सदस्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्षे असल्याने मंडळ स्थापनेपासून मंडळाचा आढावा वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. कोषाध्यक्ष विजय भामरे यांनी मंडळाचा जमाखर्च अहवाल सादर करून कार्यक्रम पत्रिका अजेंडा नुसार विविध मुद्द्यावर चर्चा होऊन एकमताने ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. ज्या सभासदांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व पदोन्नती, उद्योग क्षेत्रात विशेष कामगिरी, विद्यार्थी गुणगौरव, महिलांसाठी पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उच्च शिक्षित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version