| अलिबाग | वार्ताहर |
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभेचे आयोजन रविवार दि.26 रोजी मंडळाचे कार्यालय (तात्पुरते), सेक्टर वन/एस, प्लाँट नं.136बी, शबरी हॉटेल जवळ, नवीन पनवेल येथे करण्यात आले होते. समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधान दिवसाची माहिती मंडळाचे सचिव हेमकांत सोनार यांनी यावेळी दिली. तसेच 26/11 हल्ल्यात शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी, लष्करी कंमाडो अधिकारी व पोलीस शिपाई तसेच नागरिक इ. शहिद विरांना अभिवादन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सोनार यांनी केले.
सदर सभेसाठी दादासाहेब विसपुते, संगिता विसपुते, विजय भामरे, प्रविण भामरे, ॲड. शाम विसपुते, छोटुलाल मोरे, मनोज सोनार, उदय विभांडिक, संजय सोनार (पेण), श्रीनिवास पोतदार आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार छोटुलाल मोरे यांनी मानले.







