निवडणुकांसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी सज्ज

| पनवेल | वार्ताहर |

आगामी येणार्‍या नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी सज्ज झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतलेल्या बैठकीत दिली.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महाड येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती . या बैठकीला रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे महाडचे अध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये आगामी येणार्‍या नगरपालिकेच्या , पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांविषयी चर्चा केली . त्याचप्रमाणे दीप स्तंभ सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले .

Exit mobile version