डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखांचा चुना

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील धुतूम येथील सेवानिवृत्त कर्मचारी राजाराम ठाकूर यांच्याशी सायबर भामट्याने संपर्क साधून आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर गणवेशधारी पोलिसांचा धाक दाखवून ठाकूर त्यांना अक्षरशः घाबरवून सोडले. त्यांच्या नावाचा वापर महिलांचा व्यापार, अंमली पदार्थांची विक्री आणि मनी लाँडरिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांत झाल्याचा बनाव रचण्यात आला. त्यांच्या मनात गंभीर गुन्ह्यात अटक होईल, पोलीस कारवाई होईल, अशी भीती निर्माण करण्यात आली. या कथित प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करावे लागतील, असा दबाव टाकण्यात आला. ‘सुनीलकुमार गौत्तम‌’ नावाच्या तोतया पोलिसाने ठाकूर यांना तब्बल 17 दिवस मानसिक दहशतीखाली ठेवले. यावेळी ठाकूर यांनी आरोपींच्या सांगण्याप्रमाणे तब्बल 25 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केले. अखेर आपल्याविरुद्ध प्रत्यक्षात कोणताही गुन्हा नसताना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उरण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version