| अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात 22 अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटसची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश खा. श्रीरंग बारणे यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकार्यांना दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे संसदीय रस्ते सुरक्षा समिती आढावा बैठक मंगळवार (दि.25) रोजी खा. बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन, राष्ट्रीय महामार्ग व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.