टांझानियाच्या मंत्र्यांची जिल्हा परिषदेला भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले स्वागत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
टांझानिया देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री प्राध्यापक मकामे एम्बारवा, टांझानिया प्राधिकरणाचे प्लॅड्युस एम्बोसा आणि अन्य उच्चाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.10) रायगड जिल्हा परिषदेला भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाजाची माहिती जाणून घेत जिल्ह्यातील विकासकामांची माहिती घेतली.


भारताचे टांझानियासह आफ्रिकी देशांशी पूर्वापार मैत्रीसंबंध आहे. टांझानिया देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री मकामे एम्बारवा, टांझानिया प्राधिकरणाचे संचालक प्लॅड्युस एम्बोसा आणि अन्य उच्चाधिकारी महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी राज्याच्या विधिमंडळास भेट दिली होती. यानंतर शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. सुरुवातीला शिष्टमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना जाणून घेतली. यानंतर स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची माहिती घेत, कशा रितीने विकासकामे केली जातात याची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, कमलाकर वाघमोडे उपस्थित होते.

Exit mobile version