माथेरानमध्ये चविष्ट अळंबी हंगाम सुरू

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानच्या जंगलात उगवणारी अळंबी हे पहिल्या पावसाचे प्रमुख वैशिष्ट्य. सुरुवातीला पावसाचे आगमन झाले की, पुढील दोन ते तीन आठवडे येथील माथेरानच्या जंगलात निसर्गाचे देणे असलेली अळंबी नजरेस पडते.

माथेरानमध्ये पहिला पावसाळा सुरू झाला की येथील जंगल परिसरात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये पांढरी शुभ्र अळंबी उगवते. या पांढर्‍या शुभ्र रंगाच्या व अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबीची चव ही येथील सर्वच आबालवृद्धांच्या जिभेवर रेंगाळत राहते. काही तज्ज्ञांच्या मते, अळंबी ही हरितद्रव्यविरहित बीज धारण करणारी बुरशी आहे. या अळंबीस भूछत्र असेही म्हणतात. तर, पुरातन काळापासून संस्कृतमध्ये कुसूंप व पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो, तसेच अळंबीविषयी कुत्र्याची छत्री अशी एक चुकीची कल्पना अजूनही लोकांच्या मनात आहे. अळंबीचे काही विषारी प्रकार वगळता हा शक्तिवर्धक आणि औषधी आहार आहे.

Exit mobile version