शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कर्जत तालुक्यात मतदानाला प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान घेण्यात आले. त्यात कर्जत तालुक्यात मतदार असलेल्या 540 शिक्षक मतदार यांच्यापैकी 509 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

शिक्षक मतदार संघातही कर्जत तालुक्यातील मतदान हे तहसील कार्यालयात घेण्यात आले. शिक्षक मतदार यांनी सकाळ पासून मतदान करण्यासाठी कर्जत तहसील कार्यलयात गर्दी झाली होती. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याने प्रमुख उमेदवार असलेले महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि भाजपचे उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी सकाळपासून तहसील कार्यालयाबाहेर उपस्थित होते.

तालुक्यातील शिक्षक मतदार यांचे मत नोंदवण्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या कार्यालयात मतदान केंद्र बनविण्यात आले होते. कोकण शिक्षक मतदारसांघात कर्जत हे 31 क्रमांकाचे मतदान केंद्र होते आणि या मतदान केंद्रात 540 मतदार होते, त्यात 263 महिला आणि 277 पुरुष मतदार यांची नोंद होती. त्या ठिकाणी झोनल अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांनी तर मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी होती, तर विशेष मायक्रो निरीक्षक म्हणून संतोष उगले यांनी काम पाहिले. त्यांना मतदान अधिकारी म्हणून संदीप गाढवे, विकास राठोड आणि नितीन कांबळे यांनी काम पाहिले तसेच मदतनीस शिपाई म्हणून मनोहर वाघ यांनी काम पाहिले.

निर्धारित वेळेत कर्जत मतदान केंद्रावर एकूण 540 मतदार यांच्यापैकी 509 मतदार यांनी मतदानाचं हक्क बजावला. त्यात 238 महिला मतदार यांनी तर 271 पुरुष मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या निवडणुकीसाठी राजकीय चुरस मतदान केंद्राबाहेर पाहायला मिळाली. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडी मधील घटक पक्षाचे कार्यकर्त्ये यांनी गर्दी केली होती. त्यात माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, जेष्ठ नेते विलास थोरवे, शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, जिल्हा परिषद माजी सभापती नारायण डामसे, तसेच तालुका चिटणीस श्रीराम राणे, तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक, गजानन पेमारे आदींसह कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्ण जोशी आदी प्रमुख तसेच तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर भाजप उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्यासाठी काही वेळासाठी आ. महेंद्र थोरवे हे उपस्थित झाले होते. तर भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संभाजी जगताप, भाजपचे सुनील गोगटे, तालुका चिटणीस संजय कराळे यांच्यसह उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल आदी पदाधिकारी ठाण मांडून होते.

आमदारांचा फोटो असलेली गाडी हटवली
कर्जत तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदार शिक्षक यांना काही आरोग्य समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावेत यासाठी रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते. मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर आमदार महेंद्र थोरवे यांचे तीन बाजूला फोटो होते. आणि ती रुग्णवाहिका मतदान केंद्राच्या गेट वर दर्शनी भागात उभी होती. त्याबाबत सकाळी आठ वाजता शेकाप कार्यकर्ते यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता रुग्णवाहिका हलविण्यात आली नाही आणि आमदार थोरवे यांचे फोटो असलेले स्टिकर झाकले गेले नाहीत. मात्र अकरा वाजता उमेदवार बाळाराम पाटील यांचे स्वीय सहायक पाटील यांच्याकडून आचारसंहिता भंग होत असलेली तक्रार करणारे लेखी निवेदन तहसीलदार डॉ शीतल रसाळ यांना देण्यात आले. त्यावेळी या निवडणुकीचे झोनल अधिकारी डॉ रसाळ यांनी शेकाप कार्यकर्ते यांना अर्ज देण्याची आवश्यकता नाही असे सांगून त्या ठिकाणी वरून रुग्णवाहिका बाहेर काढण्याचे आदेश चालक यास दिले.

त्यामुळे कर्जत कार्यलयाच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका तात्काळ हटविण्यात आली. त्यामुळे शेकापचे पत्र न घेता झोनल अधिकारी यांनी तेथून रुग्णवाहिका हलविली आणि आचारसंहिता भंग होण्याचा गुन्हा दाखल होता होता टळला आहे. मात्र मतदान सुरु झाले तेंव्हा पासून सकाळी आठ ते अकरा या वेळेत मतदान केंद्राबाहेर दर्शनी भागात आमदार थोरवे यांचे फोटो असलेली रुग्णवाहिका कोणत्या कारणासाठी उभी करून ठेवण्यात आली होती. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Exit mobile version